जळगाव बुद्रुक येथे जोरदार पाऊस शेती पिकांचे मोठे नुकसान
- Get link
- X
- Other Apps
नांदगाव-: वार्ताहर
काल सायंकाळ पासून जोरदार बरसत असलेल्या पावसाने तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने शेतकरी या अस्मानी संकटाने हतबल झाले आहेत.
मका व बाजरी पिके सद्यस्थितीत दाणे परिपक्व होण्याच्या स्थितीत आहेत.त्यांना ही या परतीच्या पावसाने मोठा फटका बसत आहे.तर एक एकरसाठी हजारो रुपये खर्चून लागवड केलेल्या कांदा पिक तर अक्षरशः वाहून जात आहे.यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.
अत्यंत महागडे कांदे बियाणे घेऊन,भरमसाठ मजुरी देऊन ही कांदा लागवड करण्यात आली होती.मात्र परतीच्या पावसाने यावर 'पाणी फिरवले असल्याचे दिसून येत आहे.नुकतीच लागवड केलेल्या कांदा पिकात साचलेल्या पाण्यामुळे कोवळ्या अवस्थेत असलेली रोपे सडून जात आहेत.पाऊस बंद झाल्यानंतर शेतकरी या पिकातील पाणी बाहेर काढतात,अन काही वेळानंतर पुन्हा जोरदार पाऊस कोसळतो.त्यामुळे हा पाठशिवणीचा खेळ कालपासून सुरू असल्याचे दिसून येत आहे.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment